Kiran Patil


मी किरण माणिकराव पाटिल (संस्थापक अध्यक्ष -युवा अस्तित्व फाऊंडेशन)

थोडसं माझ्याबद्दल :

माझे आई-वडिल यांनी आयुष्यभर काबाडकष्ट करून आमच्यावर नेहमीचं चांगले संस्कार केले आणि आयुष्यात एकचं शिकवण दिली ती भुकेल्याला जेवणाची,  ऊघड्याकपड्यांची,  अंधास डोंळ्याची तर अपंगास चालण्याची मदत कर.....
आणि हिच शिकवण आज मला प्रेरणा देतेय..
अवघ्या तीन वर्षापूर्वी नाशिक तालुक्यातील आश्रम शाळा,  आदिवासी पाडे,  जिल्हा परिषद शाळा व काही वंचित ठिकाणी भेट देऊन तेथील अनाथ मुलांच्या संगोपन व शिक्षणासाठी मदत म्हणून कामे चालू केली,   बघता बघता नाशिक सोबत संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक अनाथ व  गरजूंपर्यंत जाऊन पोहोचलो,  त्यात अनाथ मुलांचे शिक्षण/नोकरी, गरिब व होतकरू मुलांचे शिक्षणासाठी मदत,  जि.प.शाळा डिजिटल बनवणे,  वयोवृद्धांचे संगोपन,  पाणी प्रश्न, गरजूंना रक्त पुरवठा, वैद्यकीय सेवेत मदत अश्या अनेक समस्यांवर काम केले या कामांत आपल्यासारखी अनेक जण जोडले गेले आणि यातूनचं तयार झाले ते युवा अस्तित्व फाऊंडेशन, महाराष्ट्र

आजवर माझे एकचं ध्येय आहे,  घरापुरतच  मर्यादित न राहता अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी व तसेच अंध , अपंग,   गोर गरीब,  भुकलेले,  तहानलेले कोणीही असूदे त्यांना घासातला घास काढून आपण त्यांना या समाजाच्या प्रभावात आणूया आणि समाजात मानाचे स्थान देऊया.आपले समाजबांधवाप्रति काही कर्तव्ये आहेत. बस्स त्या कर्तव्याची जाण माणसाला असली पाहिजे,  इतकंच....!

सारे आयुष्य स्वतः साठी...
एक दिवस अनाथांसाठी..!!

"जिथे कमी तिथे आम्ही"

आपलाचं मित्र,
किरण माणिकराव पाटिल


FACEBOOK

Donate

ACCOUNT NAME

YUVA ASTITVA FOUNDATION

ACCOUNT TYPE

CURRENT

BANK NAME

DCB BANK LTD.

ACCOUNT NO

09 5213 0000 1687

IFSC CODE

DCBL0000095

BRANCH

NASHIK